महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचार्यांची घेतली आढावा बैठक
नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना

अमरावती /7 ऑगस्ट : अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणार्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या तयारीला वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिकेच्या बिटप्यून कर्मचार्यांची विशेष आढावा बैठक स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक कर्मचार्याने जबाबदारीची जाणीव ठेवून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर, विविध आजारांच्या तपासण्या तसेच सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि गरजू घटकांना होणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे. बैठकीत शिबिरस्थळी करण्यात येणार्या विविध व्यवस्थांबाबत
या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक संजय तिरथकर, डॉ.प्रशांत देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, स्वास्थ अधिक्षक विजय बुरे, प्रल्हाद चव्हाण, बिटप्यून उपस्थित होते.




