विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात

अमरावती /2 जुलै: महाराष्ट्रात विशेष सघन पुनरीक्षण अर्थात डखठ कार्यक्रमांतर्गत मतदार यादी पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमानुसार 20 ते 29 जून 2026 दरम्यान फॉर्म छपाई व बीएलओ प्रशिक्षण, 30 जून ते 29 जुलै 2026 दरम्यान घरभेटी व फॉर्म संकलन, 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान दावे-हरकती, 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत निकाली प्रक्रिया आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर साईबाबा विद्यालय मतदान केंद्र, साईनगर अमरावती येथे भाग क्रमांक 185 चे बीएलओ ज्ञानेश्वर टाले व भाग क्रमांक 182 चे बीएलओ प्रशांत भागवत यांनी 1 जुलै 2026 रोजी दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर व वंदना एडतकर यांना फॉर्म देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून मतदार यादीतील माहितीची पडताळणी करावी, तसेच आवश्यक दुरुस्ती, नोंदणी किंवा बदलांसाठी फॉर्म वेळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले.




