टिन्नू यादवसह 8 जणांविरुध्द FIR दाखल

SIT च्या चौकशीत 17 आरोपी

अयोध्या /25 जून: राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गुरुवारी एफआयआर (ऋखठ) दाखल केली आहे. यात 8 आरोपी बनवण्यात आले आहेत. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या (डखढ) प्राथमिक अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला.
एसआयटी (डखढ) तपासणीसाठी 13 जून रोजी स्थापन करण्यात आली होती. 23 जून रोजी तिने आपला अहवाल सरकारला सादर केला. एफआयआरमध्ये (ऋखठ) ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे चालक रामशंकर यादव (टिन्नू), लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष चंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये चंपत राय यांचे नाव नाही.यादरम्यान, चंपत राय यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली होती, परंतु मंदिर बांधकाम प्रभारी गोपाल राव यांनी ती फेटाळून लावली. एफआयआरमध्ये चंपत राय यांचे नाव निश्चित मानले जात होते. यापूर्वी सूत्रांकडून माहिती समोर आली होती की, एसआयटीने तपास अहवालात चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह 17 जणांना आरोपी मानले होते. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होणे जवळपास निश्चित मानले जात होते.डखढ ला चौकशीदरम्यान दानपेट्यांच्या चाव्या टिन्नूकडे मिळाल्या होत्या. डखढ ने सुमारे 150 अशा सेवकरी आणि कर्मचार्‍यांची ओळख पटवली होती, ज्यांच्या आर्थिक स्थितीत 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बदल झाला होता.

संबंधित बातम्या

Back to top button