मी एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार

ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का

कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतला निर्णय

धाराशिव/21 जून: एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करतोय, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना केली. धाराशिवमधील गोवर्धन वाडीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले, त्यानंतर बोलताना ओमराजेंनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाच्या निकालावर भाष्य केल्यानंतर राजकीय दवाबामुळे, सत्तेमुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांची कामे होत नसल्याचे ओमराजेंनी म्हटलं. मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटलो, गेले 4 तास बैठका सुरू होत्या, मी सर्वाचे मत जाणून घेतले. सगळ्याच्या कार्यकर्त्यांच्या मला सूचना आहेत, मला थोडी पार्श्वभूमी सांगायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या निवडणूक लढत असताना आम्हाला यश मिळाले नाही. सामान्य नागरिकांना वेळ दिला प्रश्न सोडवले, आम्ही कामात कधी पडलो नाही? सत्तेमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असे म्हणत आपली खंत ओमराजेंनी बोलून दाखवली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button