भाजपचे प्रविण पोटे विजयाच्या दिशेने काँग्रेसच्या उमेदवाराची दांडी गुल
भाजपचा बालेकिल्ला सुरक्षित: अमरावतीत पक्षाची पकड अधिक घट्ट

डॉ. निलेश विश्वकर्मा संपुष्टात: प्रभावी प्रचाराचा अभाव ठरणार कारणीभूत
अमरावती/17 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज 18 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सात मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाणार असून, 15 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आपला कौल नोंदवणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असून, त्यांनी मागील निवडणुकीप्रमाणे यावेळेस पुन्हा ’क्लीन स्वीप’ करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तातडीने माघार घेतल्यासारखी स्थिती निर्माण केली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांना मतदारांमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. यामुळे या मतदारसंघाचे मैदान भाजपसाठी पूर्णपणे मोकळे झाले आहे.
महायुतीने प्रवीण पोटे पाटील यांना रिंगणात उतरवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत जिल्ह्यातील मतदार सदस्यांशी थेट संवाद साधला. महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावतीचा दौरा करून स्थानिक पदाधिकार्यांची बांधणी केली. या प्रक्रियेत महायुतीमधील घटक पक्षांचे नेते, विशेषतः अजित पवार गटाचे आ. संजय खोडके व सुलभा खोडके, शिंदे गटाचे विदर्भ विभागीय नेते आ. बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आ. रवी राणा यांनी भाजप उमेदवाराला सक्रिय पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात एकूण 451 मतदार असून, त्यापैकी भाजपचे स्वतःचे 150 मतदार आहेत. महायुतीमधील घटक पक्षांचे बळ पाहता अजित पवार गटाचे 33, युवा स्वाभिमान पक्षाचे 26, प्रहार जनशक्ती पक्षाचे 21 आणि शिंदे गटाचे 18 मते एकत्र केल्यास ही संख्या 248 वर पोहोचते, जी विजयासाठी पुरेशी आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे 120, ठाकरे गट शिवसेनेकडे 22, शरद पवार गटाकडे 11 आणि एमआयएमकडे 16 मते आहेत. इतर अपक्ष व छोट्या पक्षांची 36 मते विचारात घेता भाजपविरोधी मतांचे पारडे जड दिसत नाही. निवडणुकीच्या रिंगणात सक्षम प्रतिस्पर्धी नसल्यामुळे पोटे पाटील यांची वाटचाल विक्रमी विजयाकडे सुरू आहे




