हरीना मुळे नेत्रदान एक विशाल चळवळ बनली

मनोहर कोटनाके यांचे प्रतिपादन

* जागतिक नेत्रदान दिन कार्यालयाचे उद्घाटन

अमरावती/3 जून ; हरीना फाउंडेशनमुळे नेत्रदानाचा महायज्ञअमरावतीत नेत्रदान चळवळीचा विस्तारजागतिक दिनानिमित्त नवीन कार्यालयाचे लोकार्पणअमरावतीत आज नेत्रदान चळवळ एका लोकचळवळीचे रूप घेत असून, या प्रवासात ’हरीना फाउंडेशन’चे कार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे. जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या नेत्रदान चळवळीमुळे आज अनेक नागरिक स्वतःहून नेत्रदानासाठी पुढे येत आहेत, असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी व्यक्त केले.गेल्या 16 वर्षांपासून आपण हरीना फाउंडेशनच्या कार्याचा अभ्यास करत आहोत. ज्या निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही संस्था नेत्रदान कार्यासाठी झटत आहे, ती इतर सामाजिक संस्थांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सुप्रसिद्ध सीए राजेश चांडक यांनी काढले. स्व. बन्सीलालजी अडवानी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचे पुत्र राजकुमार अडवानी यांनी, वडिलांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवताना आज हरीना फाउंडेशनच्या व्यासपीठावर उपस्थित राहणे आपल्यासाठी भाग्य असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज राठी यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. ‘माझ्या जीवनाची अंतिम भेट-राष्ट्रासाठी’ या संकल्पनेवर आधारित मोहीम लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू होणार असून याद्वारे नेत्रदानाचा संकल्प अधिक व्यापक केला जाईल. आयोजन समितीचे अध्यक्ष पूरणलाल हबलाणी यांनी 10 जून रोजी होणार्‍या जागतिक नेत्रदान दिन कार्यक्रमात सर्व सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक व राजकीय संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी श्रीमती सावित्रीबाई बन्सीलाल अडवानी व सौ. नम्रता हबलाणी यांची विशेष उपस्थिती होती. अ‍ॅड. सचिन देवरुकर यांनी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोनिका उमक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजेंद्र वर्मा यांनी केले.कार्यक्रमात माजी महापौर सौ. चरणजीत कौर नंदा, किरण भाऊ पातुरकर, सुरेश जैन, काझी अहद अली, प्रवीण ढवळे, संजय लढा, चंद्रकांत पोपट, सुरेंद्र पोपली, शरणजीत सिंग अरोरा, प्रा. मुकेश लोहिया, सुरेश रतावा, राजेंद्र भंसाली, शरद कासट, मनीष सावला, सारंग राऊत, राजेंद्र पंजगाडे, धीरॉज गांधी, कबीरलाल ओस्तवाल, लकी नंदा, नरेश सोनी, समीर धर्माळे, प्रकाश टेटू, हेमंत जामले, नितीन देशमुख, अविनाश राजगोरे, रमेश देशमुख, नियाज खान, सुरेश वसानी, विजय देवळे, दिनेश कोने, प्रवीण ढवळे, भूषण प्रकाशराव दलाल, सागर बेलसरे, प्रदीप भाकरे, संतोष मलानी, निलेश तगारे, सचिन देवरुकर, जितेंद्र पिंपळकर, रमेश वर्हडकर, अजय जोशी, सौ. बरखा बोझो, सौ. पूजा जोशी, कल्याणी मुदलियार, रेशमी नावंदर व सृष्टी बोझो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button