प्रेमसंबंध ठेव अन्यथा तुला मारुन टाकतो

तरुणाकडून तरुणीला धमक्या

-लग्नासाठीही आणला दबाव
तिवसा / 22 जून: एका 25 वर्षीय युवकाने परिचयातील 21 वर्षीय तरुणीसमोर प्रेमाचा आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याचा स्विकार केला नाही तर त्याने तरुणीला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तिवसा येथे ही घटना घडली. तरुणीच्या तक्रारीवरुन तिवसा पोलिसांनी आरोपी युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध सुभाष झटाले (रा. लुंबिनी नगर, तिवसा) असे आरोपीचे नाव आहे.
अनिरुद्ध आणि पिडित तरुणी यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यांचे फोनवरुन बोलणे होते होते. दरम्यान अनिरुद्धने तरुणीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला आणि आपण लग्न करु असेही सांगितले. मात्र आपल्या मनात तसे काही नसल्याचे सांगून तरुणीने त्याकरिता नकार दर्शविला. तरुणीने अनिरुद्धसोबत संपर्कही तोडला होता. तेव्हा अनिरुद्धने वेगवेगळ्या मोबाईलवरुन तरुणीशी संपर्क साधून तिला त्रास देणे सुरु केले. त्याने तरुणीचा पाठलागही सुरु केला. आपल्यासोबतच प्रेम संबंध ठेव, लग्न कर असे सांगत त्याने तरुणीवर दबाव आणला. अन्यथा जिवे मारण्याची धमकी त्याने तरुणीला दिली.
काही दिवसांपूर्वी अनिरुद्धने तरुणीला रस्त्यात गाठले आणि पून्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. यावेळी त्याने तरुणीला शिवीगाळही केली. तुझे वडिल मधात आले तर तुला आणि तुझ्या वडिलांना जिवानीशी मारुन टाकतो, अशी धमकी त्याने यावेळी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिवसा पोलिस ठाण्यात जावून याबाबत तिने तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी अनिरुद्ध झटाले याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button