शिवसेनेचा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी राज्यव्यापी ‘मेगा प्लॅन’

2029 च्या निवडणुकांचे वेध; ‘महायुती’च्या गोटात धुसफूस

अमरावती/29 मे– राज्याच्या राजकारणात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटली असली, तरी 2029 मध्ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. महायुतीमधील घटक पक्ष आता एकसंध राहण्याऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विशेषतः शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी महायुतीतील भविष्यातील अनिश्चितता ओळखून स्वबळावर तयारीला सुरुवात केली आहे.शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच एक ’मेगा प्लॅन’ अंमलात आणला असून, राज्यभरातील 200 हून अधिक मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केवळ वरवरची चर्चा न करता, थेट बूथ पातळीवरील यंत्रणाबळकट करण्यावर पक्षाचा भर आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक पातळीवर ’बूथ लेव्हल एजंट’ नोंदणी आणि मतदारसंघांचा सखोल आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. या दोघा नेत्यांकडे प्रत्येकी 100 मतदारसंघांची जबाबदारी असून, ते सध्या राज्याचा दौरा करून गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.या रणनीतीचा सकारात्मक परिणाम आता जमिनीवरही दिसून येऊ लागला आहे. उदय सामंत यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केला असता, लातूरमधील अहमदपूर येथे आज आयोजित भव्य मेळाव्यात माजी आ.विनायक पाटील यांच्यासह 25 हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button