नीटचा पेपर आता 21 जूनला, पुढच्या वर्षापासून ऑनलाइन

पेपरफुटीनंतर केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/15 मे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या छएएढ-णॠ 2026 परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. आता ही पुर्नपरीक्षा रविवार, 21 जून रोजी पार पडणार आहे. यापूर्वी 3 मे रोजी देशभरातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमधील 5,400 हून अधिक केंद्रांवर तब्बल 22.79 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
मात्र, पेपरफुटीच्या संशयावरून 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, 12 मे रोजी जेव्हा आम्हाला पेपरफुटीचे प्राथमिक संकेत मिळाले, तेव्हा एकाही अपात्र उमेदवाराची निवड होऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश होता. अशा गैरप्रकारांबाबत आमचे धोरण ’शून्य सहनशीलतेचे’ ) आहे. दुर्दैवाने अशी घटना घडली, परंतु विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता आम्ही तत्परतेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नव्याने होणार्‍या या परीक्षेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांच्यावर मानसिक किंवा आर्थिक ताण पडू नये, यासाठी शिक्षण मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शिक्षणमंत्री प्रधान यांनी जाहीर केल्यानुसार, या पुर्नपरीक्षेसाठी विद्यार्थ्यां कडून एकही रुपया अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. उलट, आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रासाठी नव्याने शहराची निवड करण्याची विशेष मुभा दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेतही 15 मिनिटांची वाढ करण्यात आली असून, आता ही परीक्षा दुपारी 2:00 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत चालेल. या परीक्षेची नवीन प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जातील.

संबंधित बातम्या

Back to top button