कारची उभ्या टेम्पोला धडक, 8 जण ठार

5 गंभीर, जेजुरीजवळ भीषण अपघात

पुणे / 18 जून: पुणे जिल्ह्यातील जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीहून मोरगावकडे भरधाव वेगाने जात असलेली स्विफ्ट डिझायर कार ( एमएच 42/एक्स 1060) ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पो (एमएच 12 / एक्सएम 3694) ला धडकली. हा अपघात श्रीराम ढाब्याजवळील एका कंपनीसमोर घडला. अपघातावेळी टेम्पोमधून सामान उतरवण्याचे काम सुरू होते. ही धडक इतकी जोरात होती की, ही कार टेम्पोच्या बाजूला असणार्‍या कार ( क्र.एम एच 12, टीके 9483) वर आदळली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतांमध्ये सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी यांचा समावेश असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही. तर जखमींची नावेही रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

संबंधित बातम्या

Back to top button