सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अॅड. आकाश मोरे रिंगणात
बारामतीत काँग्रेसने खेळले ‘धनगर कार्ड’ मोरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे /5 एप्रिल: बारामतीपोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचाउमेदवार ठरला असून आकाशमोरे यांच्या नावाची पक्षाकडूनघोषणाकरण्यातआली आहे.काँग्रेसने आकाश मोरे यांच्यानावाची घोषणा केली असून तेसोमवारी उमेदवारी अर्ज दाखलकरणार आहेत. बारामतीचीनिवडणूक ही बिनविरोध व्हावीयासाठी प्रयत्न केले जात होते,मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यामध्येयश आल्याचं दिसत नाही.काँग्रेसने बारामतीमध्येधनगर कार्ड खेळण्यात आलंअसून आकाश मोरे यांना सुनेत्रापवार यांच्याविरोधातपोटनिवडणुकीच्या रिंगणातउतरवण्यात आलं आहे. काँग्रेसनेही घोषणा केल्यानंतर आतामहाविकास आघाडीतील शरदपवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंचीशिवसेना यावरकायनिर्णयघेणारयाकडेसर्वांचं लक्षलागलं आहे.लोकशाही टिकवण्यासाठीआम्ही निवडणूक लढवत असूनआमचा मूळ शत्रू हा भाजप आहेअशी पहिली प्रतिक्रिया आकाशमोरे यांनी दिली. बारामतीमध्येअनेक मुद्दे असून त्यामध्ये अजितपवारांच्या अपघाताच्या तपासाचामुद्दाही आहे, या मुद्द्यांना वाचाफोडण्यासाठी आम्ही हीनिवडणूक लढवत आहोत असंहीआकाश मोरे यांनी म्हटलं. जरसरकारने अजित पवारांच्याअपघातावर गुन्हा दाखल केलातर उमेदवारी मागे घेऊ असंही तेम्हणाले. काँग्रेसने सुनेत्रा पवारयांच्या विरोधात ज्या उमेदवाराचीघोषणा केली आहे ते आकाश मोरे हे वकील आहेत.हे आमदार होते. आकाश मोरे यांनी 2014 साली विधानसभानिवडणूक लढवली होती. ते काँग्रेसच्या विचाराने प्रेरित आहेत. दिवंगतउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असणार्या बारामतीचीपोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले केले.प्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ असं राष्ट्रवादीचेखासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधलाहोता. मात्र काँग्रेसने या ठिकाणी उमेवदार दिला आहे,
राहुल गांधींनाभेटणार-सुनील तटकर
बारामतीची पोटनिवडणूकबिनविरोध करण्यासाठी राहुलगांधीना भेटावे लागले तरी भेटू,यात काही अडचण नाही असंवक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचेखासदार सुनील तटकरे यांनीकेलं आहे. बारामतीपोटनिवडणूक बिनविरोध व्हावीयासाठी प्रयत्न सुरु आहेत.राहुल गांधी असतील किंवापक्षाचे प्रमुख म्हणून मल्लिकार्जुनखर्गे यांची सुद्धा भेट घेऊ असे तटकरे म्हणाले




