जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला

नागपूर गेट परिसरात मोठी खळबळ

* संशयित आरोपी तौसीफचा शोध सुरू

अमरावती /23 मार्च : शहराच्या नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या ताज स्टुडिओ परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेख एफज शेख सलीम (वय 28 वर्ष, रा. कमेला मैदान) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी शेख एफज आणि आरोपी तौसीफ यांच्यात गेल्या काही काळापासून जुनी रंजिश सुरू होती. याच कारणावरून काल सायंकाळी दोघांमध्ये गाठ पडली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात तौसीफने आपल्याकडील तीक्ष्ण चाकूने शेख एफजवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेख एफज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि परिसरात एकच धावपळ उडाली. जखमी तरुणाला स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, फरार आरोपी तौसीफचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, जुन्या भांडणातूनच हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
जुन्या वादाचा भयानक शेवट-किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या रंजिशमध्ये झाल्याने ही चाकूबाजीची घटना घडली. शेख एफज शेख सलीम हा गंभीर जखमी झाला असून, भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. पोलीस सध्या आरोपी तौसीफचा कसून शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button