बंगालचा रणसंग्राम; भाजपकडून 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध सुवेंदु अधिकारी मैदानात

नवी दिल्ली/16 मार्च – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या 144 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या यादीतील सर्वात लक्षवेधी लढत कोलकाता येथील भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळणार असून, भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शुभेंदु अधिकारी यांना मैदानात उतरवले आहे.
2021 च्या निवड णुकीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करणार्या अधिकारी यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठ्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रदेशातील प्रभावी नेते दिलीप घोष यांना खड़गपूर सदरमधून उमेदवारी देण्यात आली असून, बिमान महतो हे सालबोनी मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत.




