महिन्यात एकच गॅस सिलिंडर मिळणार

केंद्र सरकारच्या सूचनांनंतर गॅस वितरकांकडून नियमावली

मुंबई /8 मार्च : दुसरा घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी आता 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीचा 15 दिवसांचा कालावधी आता 10 दिवसांनी वाढविण्यात आला आहे. गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कालावधी वाढला असला, तरी तो कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक लागू झाल्याने काही ग्राहकांचा गोंधळ उडाला.
‘एलपीजी’ गॅसचा वापर घरात स्वयंपाकासाठी केला जातो. नागरिकांना दोन सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर वापरायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक हा कालावधी वाढविण्यात आला आहे. ‘आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असेल, तर तसे जाहीर करावे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. सत्यस्थिती समजल्यास नागरिकांनाही पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळेल,’ असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. आतापर्यंत पहिला सिलिंडर घेतल्यानंतर 15 दिवसांनी दुसर्‍या सिलिंडरसाठी अर्ज करता येत होता. नेहमीप्रमाणे दुसरा सिलिंडर मिळावा म्हणून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला. मात्र, दुसर्‍या सिलिंडरसाठी 25 दिवसांनी पुन्हा अर्ज करून बघा, असा संदेश मिळाला. अनेक नागरिकांना अशाच प्रकारची अडचण येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button