नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमारांचा ‘जदयू’मध्ये प्रवेश

राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

पटणा /8 मार्च : बिहारमध्ये एक मोठी राजकीय घटना घडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याने पक्षप्रवेश करत राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला. आता नितीश कुमार 75 वर्षांचे झाले आहेत तर त्यांचा मुलगा निशांत कुमार 50 वर्षांचा आहे. पन्नाशीत जेडीयूमध्ये प्रवेश करणारा निशांत लवकरच महत्त्वाची राजकीय जबाबदारी हाताळणार असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांनी बिहारमधून जेडीयूच्या तिकिटावर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button