महापालिकेतर्फे महिला शक्तीचा जागर 7 मार्चला
पालकमंत्री बावनकुळे यांची विशेष उपस्थिती

अमरावती /4 मार्च -अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 मार्च 2026 रोजी शहर स्त्री शक्तीच्या प्रबळ हुंकाराने दणाणून जाणार आहे. मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सकाळी 11 वाजता या भव्य सोहळ्याला सुरुवात होईल. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. महिलांचे सक्षमी करण, समानता आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना नवी उभारी देण्याच्या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ सत्कारच नव्हे, तर महिलांच्या योगदानाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य गाभा आहे.




