वाळकी मार्गावर 2 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती / 16 मे: अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने नांदगाव पेठ – वाळकी मार्गावर कारवाई करुन दोन इसमांकडून 8 हजार 135 किलोग्राम निव्वळ गांजा मालव हा अंमली पदार्थ आणि अन्य साहित्य असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली. नांदगाव पेठ ते वाळकी मार्गावर राठी यांच्या शेताजवळून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून निव्वळ गांजा मालव व मुद्देमाल जप्त करण्यात आला. अब्दुल शफिक अब्दुल रफिक (65, बिस्मिल्ला नगर, लालखडी) आणि सुलतान बेग जमील बेग (62, गुलिस्ता नगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी नांदगाव पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दोघांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button