विद्युत करंट लागून 4 म्हशींचा दुदैवी मृत्यू

पुसला शेतशिवारातील घटना : नुकसान भरपाईची मागणी

शेंदुरजनाघाट । 15 जून- पुसला शेत शिवारात म्हशी चरायला गेल्या असता शेता जवळील नाल्यामध्ये विद्युत खांबावरील इलेक्ट्रिक तार तुटून पडल्याने 4 म्हशींना विद्युत करंट लागून जागीच मरण पावल्याची घटना नुकतीच मौजा पुसला येथील अनिल केदार यांच्या शेतानजीकच्या नाल्या जवळ घडली. म्हैसी चरायला गेल्या असता नाल्या जवळील विद्युत खांबावरील इलेक्ट्रिक तार तुटून पडल्याने अनिल केदार पुसला याच्या 3 म्हशी व रमेश शिरभाते यांची 1 म्हैस अशा एकूण 4 म्हशींना विद्युत तारेचा कंरट लागून मरण पावल्या असुन अनिल केदार यांचे 3 लक्ष व रमेश शिरभाते यांचे 1 लक्ष रुपयांचे नुकसान झाले असुन एकुण 4 लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलीस स्टेशन शेंदुरजनाघाट दिलेल्या फिर्यादीत म्हटले असुन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जनावराचे पोस्टमार्टम केले. पशुपालकांनी विद्युत अभियंता यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button