दादांच्या मृत्यूमागे घातपात ?

आ.रोहित पवारांनी व्यक्त केला संशय

* पत्रकार परिषदेत पुराव्यासह घटनाक्रम मांडला
* विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई/10 फेब्रुवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुरावे सादर करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. रोहित पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचा मला संशय आहे असे मत व्यक्त केले. रोहित पवार यांनी यावेळी विमान कंपनीच्या मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी केली.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर तेरावा झाल्यानंतर मी माध्यमांसमोर येऊन सर्व माहिती देईल असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत अनेक पुरावे सादर करत खळबळजनक दावे केले आहेत. रोहित पवार यांनी सांगितले की, ’मला सुद्धा शंका आहे हा घातपात असू शकतो. आम्ही याबाबत रिसर्च केला.’ रोहित पवार यांनी यासंदर्भात एका तज्ज्ञाशी चर्चा केली होती त्यावेळी त्या तज्ज्ञाने एका पुस्तकाचा संदर्भ दिला. त्याने सांगितले होते की, जर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर डेगन नावाचा एजंट आहे तो मारायची पद्धत त्या पुस्तकात दिली आहे. एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर सोपा मार्ग काय तर तो चालक आहे त्याला मारलं तर विषय संपला. तो चालक म्हणजे पायलट.’ अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तो घातपात असल्याची चर्चा होत आहे. पण माझा काका गेला आहे. महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेला आहे. याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे रोहित पवारांनी सांगितले. ते म्हणाले, ’आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. ताफा देखील लागला होता.

संबंधित बातम्या

Back to top button