युवा स्वाभिमान पार्टीच्या विजयी उमेदवारांचा अभिनंदन सोहळा

आ.रवी राणा यांनी केले उमेदवारांचे स्वागत

अमरावती /18 जानेवारी – अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीने उल्लेखनीय यश संपादन केले असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या सन्मानार्थ आयोजित अभिनंदन सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. या सोहळ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
युवा स्वाभिमान पार्टीने यावेळी एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी 15 उमेदवारांनी विजय मिळवून पक्षाची ताकद सिद्ध केली. थोड्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांनाही आमदार रवी राणा यांनी विशेष महत्त्व दिले. पराभूत उमेदवारांचे मनोगत ऐकून घेण्यासाठी त्यांनी तब्बल पाच तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान निवडणुकीतील त्रुटी, अनुभव, मतदारांचा प्रतिसाद तसेच भविष्यातील रणनीती यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, आज जरी 15 उमेदवार विजयी झाले असले तरी ही केवळ सुरुवात आहे. युवा स्वाभिमान पार्टी भविष्यात निश्चितच बहुमताकडे वाटचाल करेल. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, उमेदवार आणि पदाधिकारी हा पक्षाची ताकद आहे. त्यांनी विजयी उमेदवारांना जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करताना शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला. या अभिनंदन सोहळ्यात युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून पक्षाची संघटनात्मक ताकद आणि आगामी काळातील राजकीय दिशा स्पष्टपणे दिसून आली. नवनिर्वाचित नगरसेवक सौ रजनी डोंगरे, अजय जयस्वाल, सौ गौरी शैलेंद्र मेघवानी, श्री किशोर जाधव, श्री नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, श्रीमती सुमती ढोके, श्री सचिन भेंडे, नंदा धनंजय सावदे, प्रा. प्रशांत वानखडे, महेश मूलचंदानी, योगेश विजयकर, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे, अँड.सौ प्रीती हर्षल रेवणे उर्फ बनारसे, दीपक किसनलाल साहू उर्फ सम्राट यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ह. भ.प. सागर देशमुख महाराज, निळकंठ,रावजी कात्रे, सुनील राणा, जयंतराव वानखडे, प्रमोद येवतीकर, कमलकिशोर मालानी ,शिवदासजी घुले, गंगाधर आवारे, सुखदेव तरडेजा, संजय हिंगासपुरे, ज्योती सेरीसे , सोनाली नवले, संजय मुनोत, सत्येंद्रसिंग लोटे, गणेशदास गायकवाड, पुरुषोत्तम बजाज, सुरेशजी पडोळे, समाधान वानखडे, विनोद जायलवाल, विनोद गुहे, किशोर पिवाल ,दिनेश सेठीया, मुकेश उसरे, आशिष गावंडे, निखिल आकोटकर, गौरी अमोल इंगळे, माधुरी बाखडे, सुरज मिश्रा,हर्षल रेवणे,अमोल पवार, स्वानंद पहुरकर, राजा बाखड, उदय पर्वतकर, घनश्याम डकरे, निकेश खुरखुरिया, विवेक चुटके, संजय माहुरकर, वंदना प्रशांत वानखडे, महेश्वरी बोरेकर, संगीता वाघ, राहुल बजाज, महेंद्र तुंडलियात,अविनाश काळे, नितीन मस्के, अजय बोबडे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button