क्रीडा महोत्सवात धारणी ठरली ‘धुरंधर’
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरणाने समारोप

* सांस्कृतिक कार्यक्रमात मोर्शी तर निदर्शनेमध्ये अंजनगाव पंचायत समिती अव्वल
* जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ.संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतील स्पर्धा ठरल्या लक्षवेधी
अमरावती /10 जानेवारी : जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये पंचायत समिती धारणीने प्राथमिक व माध्यमिकसह चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरत सलग चार वर्ष विजेतेपद पटकावत या स्पर्धेत धुरंधर ठरली आहे. यासह सांस्कृतिक कार्यक्रमात मोर्शी तर निदर्शनमध्ये अंजनगाव सुर्जी पंचायत समिती अव्वल ठरली. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात तीन दिवसीय जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरणाने (ता.10) झाला. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावतीतर्फे या शालेय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतिश मुगल,ओपन लिंक फाउंडेशनच्या राज्य समन्वयक चित्रा खन्ना आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी व्यासपिठावर प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, रजनी शिरभाते, गटशिक्षणाधिकारीमध्ये मोर्शी व तिवसाचे डॉ.नितीन उंडे, चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरचे प्रसाद संकपाळ,अमरावती व धामणगाव रेल्वेचे संदीप बोडखे, वरूडचे विनोद गाढे, चिखलदराचे श्री.भ. गीरासे, धारणीचे गुणवंत वरघट, दर्यापूर येथील संतोष घुगे, अचलपूर व चांदूर बाजार नंदकिशोर खरात, क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर, विस्तार संगीता सोनोने आदींची उपस्थिती होती. विनोबा टीमचे कार्यक्रम व्यवस्थापक रघुनाथ वानखडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी सागर गजभिये, उत्कर्ष मेश्राम व आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी केले. तर संचालन मनीष काळे यांनी केले तर आभार प्रविण खांडेकर यांनी केले असे प्रसिद्धी समितीचे विनोद गाढे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले, पूनम उके यांनी कळविले आहे.
या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात प्राथमिक विभागामध्ये प्राथमिक विभागातून
कबड्डी (मुले)-तिवसा, कबड्डी (मुली) -धारणी, खो-खो (मुले) -चिखलदरा, खो-खो (मुली) -धारणी, लंगडी (मुली) -धारणी, वैयक्तीक खेळात75 मीटर धावणे (मुले) -अमरावती, 75 मीटर धावणे (मुली) -चांदूर बाजार, लांब उडी (मुले) -भातकुली, लांब उडी (मुली)- अचलपूर, उंच उडी (मुले) -नांदगाव खं.,उंच उडी (मुली) -चिखलदरा आदींचा विजय झाला आहे. तर माध्यमिक विभागात कबड्डी (मुले) -वरूड, कबड्डी (मुली) -धारणी, खो-खो (मुले) धारणी, खो-खो (मुली) -धारणी हॉलीबॉल (मुले) -भातकुली,
हॉलीबॉल (मुली) -चांदूर बाजार, टेनिक्वॉईड दुहेरी (मुली) -चांदुर बाजार, बॅडमिंटन दुहेरी (मुली) -वरूड,बँडमिटन दुहेरी (मुले)-मोर्शी, 100 ु 4 रीले (मुले) -धामणगाव रेल्वे,100 ÷ 4 रीले (मुली) -धारणी, 100 मीटर धावणे (मुले) -मोर्शी, 100 मीटर धावणे (मुली) -चांदूर रेल्वे, लांब उडी (मुले)- चांदूर बाजार, लांब उडी (मुली) -चांदूर रेल्वे, उंच उडी (मुले) -नांदगाव खं.,उंच उडी (मुली) -धारणी, कुस्ती (मुले)-अमरावती, गोळाफेक(मुले)- धारणी
बॅडमिंटन एकेरी (मुली)चांदुर बाजार, बॅडमिंटन एकेरी (मुले)तिवसा, टेनिक्वॉईड एकेरी (मुली) चांदूर बाजार आदींनी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ.च्या संकल्पनेतील स्पर्धा ठरल्या लक्षवेधी जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ.संजिता महापात्र संकल्पनेतील स्पर्धेचे बक्षीस वितरण या सोहळ्यात करण्यात आले. यात चित्रकला स्पर्धा प्राथमिक गटातून अंतरा वडतकर (अचलपूर ), माध्यमिक गटातून प्रगती डोंगरे (नांदगाव ख.),हस्ताक्षर स्पर्धा प्राथमिक गटातून स्वरांगिणी अकोलकर,(चांदूर बा), माध्यमिक गटातून श्रावणी खर्चान(भातकुली), स्पेल बी स्पर्धा इयत्ता 3 व 4 गटातून मंथन धनविजय (नांदगाव ख), इयत्ता 5 व 6 गटातून फाइजा फातेमा (भातकुली), इयत्ता 7 व 8 गटातून स्नेहा कांबळे (नांदगाव ख), प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता 5 व 6 गटातून शहा हमजान अ. शहजाद व विधी शेगोकार (दर्यापूर ), इयत्ता 7 व 8 गटातून संस्कृती डवरे व सोनल इंगळे(दर्यापूर), वादविवाद स्पर्धेत अदिती सोळंके (भातकुली), तर निदर्शने जिल्हा परिषद शाळा चिंचोना (अंजनगाव सुर्जी), प्राथमिक गटातील समूह गायन स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर, समूह नृत्य स्पर्धेत अंजनगाव, समूह नाटिका स्पर्धेत चांदूर बाजार, माध्यमिक गटातील समूह गायन स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर, समूह नृत्य स्पर्धेत वरूड, समूह नाटिका स्पर्धेत चांदूर बाजार यशवंत ठरली.




