कलानगरी वेलफेयर सोसायटी आयोजित गुणगौरव सोहळा थाटात

उल्लेखनिय कार्य करणार्‍यांचा गौरव

अमरावती /10 जानेवारी : कलानगरी वेलफेयर सोसायटी अमरावती या सामाजिक संस्थेच्या 5 वर्धापन दिनानिमित्त गुण गौरव सोहळ्याचे व गाव वाला या मोबाईल अप्लीकेशनचे विमोचन जोशी हॉल अमरावतीला दिनांक 8 जानेवारी ला करण्यात आले असून या सोहळ्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, तसेच सर्व क्षेत्रातील उल्लेख कार्य करणार्‍या व्यक्तीचा मान्यवराच्या हस्ते पुरस्कार व फुलांचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ. अनुष्का वि. बेलोरकर समाजसेविका/प्रमुख प्रवक्त्या पसायदान अल्पसंख्यांक समूह कार्यक्रमाच्या अध्यक्षिका सौ. प्रीती साहू (वुमेन्स 24 न्युज चॅनेल च्या संपादिका विशेष अतिथी यश अनिल वाकळे बाल कलाकार (झी मराठी ड्रामा ज्युनियर्स फेम) विजयकुमार खंडारे सिने कलावंत (लाखनवाडीचा राजा फेम) प्रमुख पाहुणे सौ. ज्योत्स्ना करवाडे समाजसेविका व संपादिका (दैनिक युवक आधार विदर्भ) श्रीमती निलिमा अशोक भोजने( जेष्ठ साहित्यिक ) सुधीर पेंडसे ( जेष्ठ कलावंत ) या सर्व मान्यवराची उपस्थिती कार्यक्रम ला लाभली या गुणगौरव सोहळ्यामध्ये करून कदम समाजसेविका व श्रीमती इंदुमती एकनाथ गोंडाणे माजी शिक्षिका यांचे विशेष सत्कार घेण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कलानगरी वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष, सागर भोगे आशिष सुंदरकर उपाध्यक्ष, अमोल कोयकार कोषाध्यक्ष, विशाल वानखडे, अनिल मेश्राम सुजल दामोदर, नितेश कथे, प्रीती वानखडे, आदित्य खडसे, गणेश भोगे, मोहन स्वर्गे, साक्षी भोगे, राणी वानखडे, पियुष वानखडे, प्रथमेश स्वर्गे, सचिन साबळे, यांनी आयोजन केले तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष हांडे, यांनी केले व आभार प्रदर्शन सागर भोगे, यांनी केले असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांनाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

संबंधित बातम्या

Back to top button