डॉ.राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता

अमरावती /9 जानेवारी : मार्डी रोड, अमरावती येथील इंदिरा बहुउद्देश्यीय शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले असून, महाविद्यालयातील विविध पदव्युत्तर (झेीीं ॠीरर्वीरींश) वैद्यकीय अभ्यासक्रमांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (छचउ) कडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. जनरल मेडिसिन, सर्जरी, रेडियोलोजी, गायनेकॉलोजी, पीडियाट्रिक, ऑर्थोपेडिक, स्किन, ई. एन. टी, ऑप्थल्मोलॉजी, अनेस्थेसिया या विषयात पदयुत्तर अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2025 – 2026 पासुनच याचा लाभ मिळणार.
या मान्यतेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध होणार असून, परिसरातील रुग्णसेवेलाही अधिक सक्षम व तज्ञ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. अनुभवी प्राध्यापकवर्ग, अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज रुग्णालय व गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था ही या यशाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथे गरजु रुग्णांसाठी मोफत अथवा माफक दरात उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा दिली जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत उपचार, मोफत एंजियोग्राफी, मोफत एंजियोप्लास्टी, मोफत डायलिसिस, ऊइउड अंतर्गत मोफत मोतियाबिंदु शस्त्रक्रिया ची सुविधा उपलब्ध आहे. गरोदर महिलांची प्रसूती देखील उषाताई मातृदीपक योजने अंतर्गत अगदी मोफत करण्यात येत असून, जन्मलेल्या बाळाला तसेच जन्म देणार्या मातेला तीन वर्षापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प संचालक मण्डलाने केलेला आहे. गरजु रुग्णांना मोफत उच्च आरोग्य सेवा देणार्या अश्या डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात पदयुत्तर अभ्यासक्रम सुरु होणे येथे होणार्या रुग्ण सेवेची पावती आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहे.




