काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू

आरोपीला अटक

अकोला/ 7 जानेवारी -अकोल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमा रास हिदा यत पटेल मोहाळा गावातील मशि दीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना उबेद पटेल या तरुणाने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही बातमी वार्‍यासारखी जिल्हाभर पसरली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची चार पथक आरोपीच्या शोधात गठित करण्यात आली.दरम्यान पणज येथून रात्री आरोपी उबेद खान कालु खान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button