महानगरपालिकेची प्लास्टिक जप्ती व डस्टबिन मोहिम

अमरावती /7 जानेवारी : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त, झोन क्र. 2 यांचे निर्देशानुसार झोन क्र. 2 अंतर्गत राजापेठ येथील राजकमल चौक, जोशी मार्केट आणि प्रभात चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमेत एकूण 20 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आस्थापनांमध्ये कापडी बॅग, नॉन-ओव्हन बॅग, कागदी बॅग तसेच 51 मायक्रोन पेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान, विनोद ट्रेडर्स या आस्थापनामध्ये 50 मायक्रोन पेक्षा जास्त जाडीच्या पॅकिंग पन्नी, नॉन-ओव्हन बॅग आणि कागदी पॅकेट आढळले, तसेच 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या एकूण 26 किलो जप्त करण्यात आल्या. यासंदर्भात 5000/- दंड आकारण्यात आला. सदर मोहिमेत प्लास्टिक निर्मूलन नोडल अधिकारी विनोद टांक, स्वास्थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, मिथुन उसरे, सचिन सैनी आणि शैलेश डोंगरे उपस्थित होते. महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, पर्यावरण व स्वच्छतेसाठी प्लास्टिकच्या अतिरीक्त वापरापासून दूर राहावे व पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा.

संबंधित बातम्या

Back to top button