
अमरावती– महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी रोजी शहरात पंचवटी चौक ते साईनगर असा रोड शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी खा.नवनीत राणा, खा.डॉ.अनिल बोंडे, आ.केवलराम काळे, आ.राजेश वानखडे, आ.प्रविण पोटे, डॉ.नितीन धांडे, अॅड.प्रशांत देशपांडे यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते. रोड शो दरम्यान ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे जंगी व उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची कडेकोट चोख बंदोबस्त लावला होता.




