संचमान्यतेचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा
शिक्षकांचा आक्रोश, जिल्हा परिषदेसमोर धरणे

अमरावती / 14 मे: महाराष्ट्र शासनाने घेतलेला संच मान्यतेचा निर्णय शिक्षकांसाठी अन्यायकारक असून त्यामुळे विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राची मोठी हानी होणार असल्याचे सांगून शिक्षकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. संच मान्यतेचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने अमरावती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात व प्रांतिय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर यांच्या उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती (ग्रामीण व महानगर) च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्याच शासन निर्णया प्रमाणे 2024-25 ची संच मान्यता करण्यात यावी, म्हणजे बंद होणार्या अनेक शाळांना जीवनदान मिळेल. अनेक शिक्षकांची नोकरी वाचेल. अशा मागणीचे निवेदन शिक्षणाधिकार्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठविण्यात आले. उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर यांच्यासह जिल्हा कार्यवाह महानगर अरविंद चौधरी, गजेंद्र शेंडे, नीलकंठ गणवीर, रवींद्र मांगलेकर, गजानन पोटदुखे, अमोल माकोडे, बाबाराव कडू, प्रणिता शेळके, रेश्मा कपूर, दिपक चवरे, राजेंद्रप्रसाद भस्मे, श्रीमती एन.जी बजाज, आर. पी. कपिले, अविन देशमुख, शैलेश काळे, पुरुषोत्तम खैरकर, प्रवीण गायकवाड, सुनील मावस्कर, एम. एम. डोंगरे, बी. एस. सपटे, सौ. एस. जी. वैराळे, सौ. व्ही. बी. राऊत, श्रीमती व्ही. आर. रायबोले, यश म्हातारमारे, एम. एच. कुरवान, एम. वी. कुमार, पी. पी. दामले, जयश्री आडे, ए. आर. इंगळे, ए. जी. बोरकर, व्ही. पी. नागदिवे, एम. पी. गोरडे, ए. आर. जाधव, ए. एन. खत्री, आदित्य कपिले, सौ. एस. जी. बिहाडे, सौ. पी. एम. बुरंगे, डी. बी. राठोड, नितीन गणेशपुरे, पी. एस. रामटेके, एस. यू. वाघमारे, ए. व्ही. अनासाने, अनिल मावस्कर, आर. एम. उमक, एस. एम. गायकवाड, एस. जी. सोनार, वसीम फरहत आदी अनेक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.