समृद्धी महामार्गावर 27 ते 29 मेगाब्लॉक!

सुचनाफलकांसाठी गॅन्ट्री बसवण्यासाठी निर्णय

* धामणगाव, चांदूर रेल्वे दरम्यान प्रवास प्रभावित

अमरावती/25 डिसेंबर – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग काही ठिकाणी 45 ते 60 मिनीटांसाठी पुर्णतः थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन प्रवास करणार्‍या जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.समृध्दी महामार्गावर हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी. 104+080 ते कि.मी. 120+300 ता. धामणगाव रेल्वे व ता. चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यात करण्यात येणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.
ऑनलाइन वृत्तपत्र सदस्यता त्यानुसार गॅन्ट्री उभारण्याच्या कामाकरीता 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 किंवा दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर नगरगावंडी गावाजवळ साखळी क्रमांक 104.080 तसेच 105.050 येथे मार्ग बंद राहील. 28 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 किंवा दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान नागपूर वाहिनीवर नगरगावंडी गावाजवळ साखळी क्रमांक 105.065 येथे मार्ग बंद राहील. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 किंवा दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान नागपूर वाहिनीवर टिटवा गावाजवळ साखळी क्रमांक 120.300 येथे मार्ग बंद राहील. 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 4 किंवा सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर टिटवी गावाजवळ साखळी क्रमांक 120.300 येथे मार्ग वाहतुकीकरीता 45 ते 60 मिनीटांसाठी पुर्णतः थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button