रुख्मिणी पीठाला ‘क’ तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त

कौंडण्यपूर येथील श्री राजेश्वर महाराज यांच्या

जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

कौंडण्यपूर / 22 डिसेंबर – विदर्भाची पुरातन राजधानी, रुक्मिणी मातेचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील जगद्गुरु श्री राजेश्वर महाराज यांच्या अंबिकापुर रुक्मिणी पिठाला शासनाकडून आज ‘क’ दर्जा प्राप्त झाला.
याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच अंबा रुख्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आभार मानले. आणि सदर पत्र प्राप्त होताच रविराज देशमुख यांनी जगद्गुरू श्री राजेश्वर महाराज यांचा शाल, श्रीफळ व शासनाकडून मिळालेले क दर्जाचे पत्र देऊन त्यांना सन्मानित केले व आशीर्वाद घेतले. मागील अनेक दिवसांपासून रविराज देशमुख यांनी कौंडण्यपूर-अंबिकापूर येथील रुख्मिणी पिठाला क तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे. कौंडण्यपूर जवळच असलेल्या अंबिकापूर येथील जगद्गुरू श्री राजेश्वर महाराज यांच्या पिठाच्या माध्यमातून कौंडण्यपूर येथील श्री रुख्मिणी मातेचा प्रचार व प्रसार सातत्याने होत असून या शुभ कार्यासाठी शासनाने त्यांना क दर्जा दिला आहे. महाभारतातील भगवान श्रीकृष्णाचे सासर आणि श्री रुक्मिणी मातेचे माहेरघर म्हणून जगात प्रसिध्द असलेले तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर या नगरीला भव्य कॉरिडॉर साकारण्यासाठी विविध उपक्रमातून तसेच अंबा रुक्मिणी महोत्सवाच्या माध्यमातून रविराज देशमुख यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे. नुकतेच शासनाने कौंडण्यपूर नगरीला शक्तीपीठ महामार्गाशी जोडल्याचे पत्र सुद्धा रविराज देशमुख यांना प्राप्त झाले. आणि आता त्यांच्या अथक प्रयत्नानंतर जगद्गुरू श्री राजेश्वर महाराज यांच्या अंबिकापूर येथील रुख्मिणी पिठाला क दर्जा मिळवून देण्यासाठी रविराज देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज रविराज देशमुख यांनी जगद्गुरू श्री राजेश्वर महाराज यांची भेट घेतली, व पुढील शुभ कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button