मजुरांना घेऊन जाणार्‍या वाहनाचा अपघात

नऊ मंजूर जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

तिवसा /8 जून: तालुक्यातील गुरुकुंज मोझरी बायपास ते नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये मजुरांना घेऊन जाणार्‍या ओमणी कार वाहनाचा पुलाला धडक लागल्याने भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावर जाऊन आदळली. या अपघातात नऊ मजूर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी साडे आठ वाजताच्या
सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी साडेआठच्या सुमारास मोझरी येथील नवीन बायपासवरच्या पुलाजवळ आल्यानंतर ओमनी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ओमनी कार रस्त्याच्या कडेला असणार्‍या पुलावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात नऊ मजूर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामधले हे सर्व मंजूर तिवसा तालुक्यातील असून आशिष सुधाकर गोपालकर (वय 30 वर्ष), आकाश धनराज जाने (वय 28 वर्ष), अश्विन वामनराव तवर ( वय 31 वर्ष), ऋषभ भाऊराव सावळकर (वय 27 वर्ष), अक्षय नरेशराव कोठे, हर्षल सुरेश हृदरकार (वय 22 वर्ष), आकाश गरडवय (22 वर्ष), वैभव रमेशराव कुर्‍हाडे, मंगेश ठाकरे (वय 35 वर्ष) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button