राज्यातील नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष
उध्दव ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का

* भाजपचे नगराध्यक्ष पदाचे 129 उमेदवार विजयी
* शिंदे गटाला 54 राकाँ अजित पवार गटाला 40 जागा
मुंबई/21 डिसेंबर – महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 207 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना 53 व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागा जिंकत अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 28, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) 7 व शिवसेना ठाकरे गटाचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत. तर इतर समर्थक पक्ष व अन्य यांची संख्या 37 होते. राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.राज्यातील एकूण 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (21 डिसेंबर 2025) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे 214 हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना 25 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे 129, नगराध्यक्ष आणि 3 हजार 325 नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल, असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने 129 नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष
कोणाच्या किती जागा ?-पक्ष – नगराध्यक्ष – सदस्य भाजप – 129 – 3325 शिवसेना – 51 – 695 राष्ट्रवादी – 35 – 311 काँग्रेस – 35 – 131 उबाठा – 9 – 378 शरद पवार गट – 7 – 153 इतर – 22 – 140
विभागनिहाय निकाल – विदर्भ (100 जागा): भाजप 58, शिवसेना 8, राष्ट्रवादी 7, काँग्रेस 23, उबाठा 0, शरद पवार 0, इतर 4. – मराठवाडा (52 जागा): भाजप 25, शिवसेना 8, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 4, उबाठा 4, शरद पवार 2, इतर 3. – उत्तर महाराष्ट्र (49 जागा): भाजप 18, शिवसेना 11, राष्ट्रवादी 7, काँग्रेस 5, उबाठा 2, शरद पवार 1, इतर 5. – पश्चिम महाराष्ट्र (60 जागा): भाजप 19, शिवसेना 14, राष्ट्रवादी 14, काँग्रेस 3, उबाठा 1, शरद पवार 3, इतर 6. – कोकण (27 जागा): भाजप 9, शिवसेना 10, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 0, उबाठा 2, शरद पवार 1, इतर 4.
मागील नगराध्यक्ष संख्या-भाजप – 94 शिवसेना – 36 काँग्रेस – 51 राष्ट्रवादी – 29 इतर – 28 अपक्ष – 22 शिवसेना 51 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 35 जागा जिंकल्या.




