डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ

अमरावती /20 डिसेंबर : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सव निमित्त श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती,येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 18 डिसेंबर व शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे करण्यात आले होते.
या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला. सदर स्पर्धेचे समारोपीय समारंभाच्या वेळी हर्षवर्धनदेशमुख अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था,मा. श्री. दिलीपबाबु भं. इंगोले कोषाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष अॅड. गजाननराव के. पुंडकर उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रमुख अतिथी जयवंत उपाय भैय्यासाहेब वि. पाटील (पुसदेकर) उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती सुभाष बनसोड कार्यकारणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती मा. प्रा. भैय्यासाहेब मेटकर व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तुषार शेळके (19 व्या आशियाई खेळात रजत पदक विजेता) मा. एच डी भोगे आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू श्री मा. सुभाष पावडे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य मा. श्री बबनराव चौधरी त्याचप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शालेय विभागाचे उपव्यवस्थापक मा. पंडित एस पंडागळे, तसेच स्थानिक श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हारर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात यावेळी पाहुण्यांचे स्वागत फुलझाड देऊन करण्यात आले त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख यांनी याप्रसंगी सर्वप्रथम सर्व विजेत्या चंमुचे अभिनंदन केले त्याचप्रमाणे श्री. दिलीपबाबु भं. इंगोले कोषाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, यांनी याप्रसंगी खेळाडूंनी खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल खेळाडूंना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा व आशीर्वाद याप्रसंगी दिला त्यानंतर कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष गजाननराव के. पुंडकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना क्रीडा स्पर्धेमध्ये ग्रामीण क्षेत्रातील मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन करून खेळाडूंना पुढील आयुष्याच्या वाटचाली करता शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रा. सुभाष बनसोड कार्यकारणी सदस्य, शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना खेळाडू हा खेळ वृत्तीने खेळला पाहिजे त्यामुळेच खेळामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते ही वृत्ती समाजामध्ये वावरणासाठी त्याला बळ देते तुषार शेळके 19 व्या आशियाई खेळात रजत पदक विजेता) एच डी भोगे आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू यांनी याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण संस्था मध्ये शिकत असताना आपले विद्यार्थी दशक ची पार्श्वभूमी या ठिकाणी स्पष्ट केली व श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आम्हा दोघांना अगणित मदत केली त्यामुळे आम्ही आशिया स्पर्धेपर्यंत आज पोचू शकलो याचा आम्हाला आयुष्यात कधीच विसर पडणार नाही असे आपले व्यक्तिगत मत या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयातील क्रिडा खेळाडू व स्पर्धे संबंधित ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली तसेच स्पर्धा घेण्यामागचा उद्देश विशद केला यानंतर लगेचच शिवाजी शिक्षण संस्थे अंतर्गत येणार्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून सहभागी झालेल्या 17 व 19 वयोगटातील मुले व मुली च्या झालेल्या कबड्डी हॉलीबॉल, व खोखो या खेळाच्या स्पर्धेमधून विजेत्या व उपविजेत्या टीमचा बक्षीस वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला सदर स्पर्धेमध्ये नागपूर विभागाने सर्वात जास्त स्पर्धेमध्ये अव्वल दर्जा प्राप्त करून जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळवला.




