मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात एफआयआर

नवी दिल्ली– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एका कार्य क्रमात मुस्लिम महि लेचा हिजाब ओढणे महागात पडलं आहे. नितीश कुमार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. महबूबा मुफ्ती यांच्या मुलीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांनी या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली आहे.इल्तिजा यांनी पोस्ट करत म्हटलं की,’बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात कोठी बाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. एका मुस्लिम महिलेचा हिजाब बळजबरीने ओढणे म्हणजे तिचा अपमान करणे होय.




