डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त रोगनिदान व शस्त्रक्रिया

अमरावती /17 डिसेंबर : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मोर्शी रोड, अमरावती येथील विविध बाह्यरुग्ण विभागांमध्ये (ओ.पी.डी) दिनांक 17.12 .2025 ते 31.12.2025 पर्यंत विशेष रोगनिदान व शस्त्रक्रिया तसेच जयपुर फुट वाटप (कृत्रिम हातपाय ) शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या कालावधीत येणार्‍या रुग्णांना रुग्णालयातील खालील सेवा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल., ओ.पी.डी नोंदणी शुल्कासह सुपरस्पेशालिटी तपासणी नोंदणी मोफत., बेड चार्जेस सह (आय.सी.यू.वगळता) आय.पी.डी. नोंदणी मोफत., भरती झालेल्या रुग्णांकरिता नाश्ता सह दुपार व संध्याकाळचे जेवण मोफत., प्रसूती शस्त्रक्रिया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत., रक्त चाचण्या ( उइउ, ठइड, इश्रेेव र्ॠीेीि णीळपश र्ठेीींळपश चळलीेीलेिू ) मोफत., हृदयरोग संबंधित पहिल्या 10 रुग्णांना अँजिओग्राफी व इतर चाचण्या मोफत., जयपूर फूट (कुत्रीम हात पाय ) वाटप मोफत., करिता जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,श्री हर्षवर्धनजी देशमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता,डॉ. अनिल देशमुख व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवन टेकाडे व उप-वैद्यकीय अधीक्षक, डॉ. सोमेश्वर निर्मळ यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button