श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

अमरावती /17 डिसेंबर : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या 18 व 19 डिसेंबर 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त वार्षिक भव्य ’ क्रीडा महोत्सवाचे’ आयोजन श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राणांगणात करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 1500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे.
या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता महाविद्यालयाच्या मैदानावर सन्माननीय मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती उद्घाटक मा. श्री. दिलीपबाबु भं. इंगोले कोषाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रमुख अतिथी मा. डॉ. तनुजा राऊत प्र-संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, संत गाडगेबाबा अम रावती विद्यापीठ, अमरावती यांच्या हस्ते होणार आहे. या क्रीडा स्पर्धेत थलेटिक्स मध्ये धावणे (100, 200 व 400 मीटर), लांब उडी, गोळाफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी, म्हणजेच 19 डिसेंबर रोजी विविध खेळांच्या अंतिम फेर्या पार पडतील. त्यानंतर संध्याकाळी 4:00 वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून सन्माननीय मान्यवर समारंभाध्यक्ष मा. ड. गजाननराव के. पुंडकर उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रमुख अतिथी मा. ड.जयवंत उपाख्य भैय्यासाहेब वि. पाटील (पुसदेकर) उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती प्रा. सुभाष बनसोड कार्यकारणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती मा.श्री. तुषार शेळके (19 व्या आशियाई खेळात रजत पदक विजेता) विजेत्या खेळाडूंना चषक यांच्या हस्ते पदक, पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सदर स्पर्धा आयोजना करता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्राचार्य वी.गो ठाकरे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्पर्धेच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. सुभाष गावंडे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपव्यवस्थापक श्री पंडित पंडागळे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करता परिश्रम घेत आहे.




