शिवणगाव पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
तीन महिन्यांत चौथ्यांदा धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती

* भूकंप मापक यंत्र अद्याप न बसवल्याने ग्रामस्थांची नाराजी
अमरावती/16 डिसेंबर – अमरावतीच्या शिवनगाव मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके आले आहे. सकाळी 12.7 मिनिटाने हा झटका आला असून, यापूर्वी बरोबर 24, 25 नोव्हेंबर रोजी हे झटके जाणवले होते. तीन महिन्यात चार वेळा हे भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने गावात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरापूर्वी जियोलॉजिकल टीम सुद्धा शिवणगाव येथे आली होती. तेथील प्रशासकीय अधिकार्यांची भेट घेत तपास केला होता.
मात्र कोणतेही ठोस माहिती पुढे आली नाही, त्यानंतर आताही धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने शिवणगाव, शिरजगाव मोझरी येथे मुकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आले नाही, त्यामुळे हे यंत्र तातडीने बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी केली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे, यांनी माध्यांना सांगितलं की, आज ज्याप्रमाणे धक्के जाणवले, तसेच धक्के मागील महिन्यात 24 तारखेला जाणवले होते. तेव्हा दोन-तीनवेळा धक्का जाणवले होते. त्याआधी असे भूकंप सदृश्य झटके जाणवले होते. आज धक्के जाणवल्यानंतर फत्तेपूर येथील घरांमधील भांडे पडली आहेत. त्याची आपण पाहणी केली. गावातील लोकही घरातून बाहेर पडून रस्त्यांवर थांबली होती. धक्के जाणवल्यानंतर शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढलं.




