मालमत्ता कर भरणार्यांना 21 डिसेंबरदरम्यान 100% शास्तीमाफी
महापालिकेकडून करदात्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा

* सुट्टीच्या दिवशीही झोननिहाय शिबिरे मुदत ओलांडल्यास दंड आकारणी
अमरावती /12 डिसेंबर : महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने शहरातील करदात्यांसाठी विशेष शास्ती/दंड माफी सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, 6 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कर एकरकमी भरल्यास नागरिकांना शास्तीवर 100 टक्के सूट मिळणार आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शहरातील करसंकलन वाढून विकासकामांना गती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सुट्टीच्या दिवशीही शिबिरे – नागरिकांसाठी विशेष सोय
करदात्यांना कार्यालयीन तासांमध्ये कर भरणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन अमरावती महापालिकेने विशेष उपक्रम राबवला आहे. येत्या शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही झोननिहाय मालमत्ता कर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना थेट मार्गदर्शन, कर भरण्याची सुविधा तसेच थकबाकीची माहिती मिळणार आहे.
महापालिकेच्या प्रत्येक झोन कार्यालयात कर्मचारी तैनात राहणार असून, नागरिकांची अनावश्यक दिरंगाई टाळण्यासाठी शिबिरांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. सप्ताहाअखेर आयोजित होणार्या शिबिरांमुळे मोठ्या प्रमाणात कर भरणे अपेक्षित असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, 21 डिसेंबरनंतर शास्तीमाफीची योजना लागू राहणार नाही. ठरावीक मुदत ओलांडून मालमत्ता कर न भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांकडून दंड आणि अतिरिक्त शास्ती आकारली जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी दिलेल्या कालावधीतच कर भरणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना रांगेत न थांबता सहजपणे कर भरता यावा यासाठी डिजिटल पेमेंटची सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. करदाते क्रेडिट/डेबिट कार्ड, झजड मशीन, टठ कोड स्कॅन करून पेमेंट, Paytm, Google Pay, BHIM² UPI या माध्यमांचा वापर करून कर भरू शकतात. याचबरोबर, ऑनलाइन कर भरल्यास 3% अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर -www.amravatimc.org – जाऊन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.




