बडनेरा परिसरात मनपाची प्लास्टिक-जप्ती मोहीम

नियमभंग करणार्‍या डेअरीवर 5,000 दंड

अमरावती /11 डिसेंबर : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे (झोन क्र. 4) यांच्या मार्गदर्शनाखाली आज झोन क्र. 4 अंतर्गत बडनेरा रोड व साईनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहिम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान एकूण 2 चौपाटी, 2 मंगल कार्यालये आणि 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान श्री राधे राधे दुध डेअरी या आस्थापनात 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पन्नीचे 1/2 पॅकेट आढळून आले. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनावर 5,000 इतका दंड आकारण्यात आला. या मोहिमेत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, प्लास्टिक निर्मूलन नोडल अधिकारी विनोद टांक, स्वास्थ्य निरीक्षक अनिल गोहर, सोपान माहुलकर, प्रियंका बैस, वैभव खरड, सुमेध मेश्राम आणि यश सावरकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेकडून परिसरातील प्लास्टिक वापर नियंत्रित करण्यासाठी अशाप्रकारच्या मोहिमा पुढेही राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button