इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी 28 डिसेंबर रोजी परीक्षा

अमरावती /10 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवी साठी परीक्षेचे आयोजन रविवार 28 डिसेंबर, 2025 रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 758 केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 13 हजार 789 शाळा व एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www. mscepune.in व  https:// mscen mms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर 10 डिसेंबर पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. 27 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button