माळी समाजाचा परिचय मेळावा 14 डिसेंबरला

जीवनसाथी-सोयरीक परिचय पुस्तिकेचे होणार विमोचन

अमरावती /4 डिसेंबर :  येथील ज्योती सावित्री माळी विकास प्रतिष्ठान व फुलमाळी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 14 डिसेंबर 25 रोजी 15 वा राज्यस्तरीय माळी समाज युवक युवती परिचय सोहळा स्थानिक कठोरा नाका येथील व्हीएमव्ही परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात सकाळी 11 ते 4 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदरील परिचय संमेलनात, ’जीवनसाथी- सोयरीक ’ परिचय पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होईल. सर्व शाखीय माळी समाजातील विवाहोत्सुक युवक युवती व पालकांनी सदरील मेळाव्या मध्ये उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन मेळावा अध्यक्ष देवेंद्र ढोक, प्रकाश आमले, संस्था अध्यक्ष अशोकराव इंगळे, इंजि. विनायक देशमुख, कार्याध्यक्ष प्रकाश तायडे, उपाध्यक्ष गणेशराव जामोदकर, प्रा. डॉ. श्रीधर धाकूलकर, डॉ. रामकृष्ण भुस्कडे, गजानन गवळी, सचिव गजानन व्यवहारे, कोषाध्यक्ष अशोकराव खटाळे, नंदकिशोर गारुडी, मार्गदर्शक अरविंद अकोलकर, इंजि. वासुदेवराव चौधरी, प्रसिद्धी प्रमुख ऍड. प्रभाकर वानखडे, रमेशपंत मालसुरे, सचिन वानखडे, भास्कर अटाळकर, गणेश मानकर, सोनाली नवले, विलास राऊत, सुरेश बिरे, जानराव राऊत, श्रीराम आमले, कमलाकर राऊत, भास्कर आखरे, दिनकर गवळी, राजाभाऊ जामोदकर, प्रदीप नवले, विश्वनाथ गायकी, माणिक राऊत, ज्ञानेश्वर बनकर, प्रदीप राऊत, नरेंद्र अघाडे, महिला व युवक आघाडी आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button